जीवनातील संवेदनशील प्रश्नांची उकल करण्यासाठी संख्याशास्त्र पद्धती महत्वपूर्ण -डॉ.आर.एल.शिंदे 

 

अमळनेर प्रतिनीधी येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत संख्याशास्त्र विभागामार्फत आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.आर.एल.शिंदे सर यांचे “Estimation of Population Proportion under Sensetive Questions” या विषयावर आज व्याख्यान संपन्न झाले. दैनंदिन जीवनात संख्याशास्त्र कशी महत्त्वाची भूमिका बजावते हे सरांनी पटवून दिले. नियमित किंवा वास्तविक जीवनातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यातून महत्वपूर्ण निष्कर्ष काढण्यासाठी सांख्यिकीय दृष्टिकोन कसा महत्त्वाचा ठरतो हे सचोटपणे स्पष्ट केले. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत संख्याशास्त्रीय ज्ञान कशा पद्धतीने वापरले जाते याचे महत्त्व स्पष्ट केले. नंतर सरांनी संवेदनात्मक प्रश्नांतर्गत एकूण लोकसंख्येपैकी असणारी आकडेवारी किंवा टक्केवारी कशी शोधावी यासाठी संख्याशास्त्रातील महत्त्वपूर्ण अशा दोन सांख्यिकीय पद्धतींचा, “Warner’s” पद्धत आणि “Simmons” पद्धतीचा वापर कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले. आणि या माहितीचा आपल्या सामाजिक संवेदनशील प्रश्नांची उकल करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो हे प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले.प्रस्तुत कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरगोस प्रतिसाद होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात सरांनी संख्याशास्त्र विषयाचे प्रत्येक क्षेत्रात असणारे महत्त्व विशद केले.संख्याशास्त्र विषय हा जवळजवळ सर्वच कार्यालयांमध्ये वापरला जातो असे सरांनी सांगितले. संख्याशास्त्र विषयाला विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे यावरून संख्याशास्त्र विषयाला असणारे महत्त्व सरांनी पटवून दिले.प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक संख्याशास्त्र विभागाचे इन्चार्ज प्रा.उमेश येवले यांनी केले. प्रस्तुत समारंभ प्रसंगी संख्याशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच महाविद्यालयाचे माजी उपप्रचार्य प्रा. डॉ. पी. बी भराटे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रस्तुत कार्यक्रमाप्रसंगी प्रा.जे.सी.अग्रवाल,प्रा.जे.बी जैन, प्रा.नलिनी पाटील तसेच इतर सहकारी प्रा. मोहिनी साळी, प्रा. प्रियंका बागुल उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भावना खैरनार यांनी केले तर आभार प्रा.अश्विनी कोळी यांनी मानले.

संख्याशास्त्र विभागातील कर्मचारी श्री. गुणवंत वाघ आणि श्री. चंद्रकांत ठाकूर यांचे कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयातील श्री.दिपक चौधरी यांचे देखील तांत्रिक कामांसाठी सहकार्य लाभले. सदरच्या समारंभाकरिता खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल, प्राचार्य डॉ.अरुण जैन, संस्थेचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,डॉ. विजय तुंटे,डॉ.मुकेश भोळे, उपप्राचार्य डॉ.अमित पाटील यांच्यासह संख्याशास्त्र व करिअर कौन्सलिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!