अमळनेर प्रतिनीधी येथील राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या निर्माण झालेल्या विविध समस्या विरोधात सरकारचा जाहीर निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की,शेतक-यांच्या शेकडो समस्या या देशात व महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या आहेत.या समस्यां विरोधात *राष्ट्रीय किसान मोर्चा* या शेतकऱ्यांच्या राष्ट्रव्यापी संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडलेले आहे.सदर आंदोलन दोन टप्प्यात होणार आहे.त्याचा पहिला टप्पा म्हणून दि.७ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी,ग्राम विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले.
*टप्पा क्रमांक २……*
२५ ऑक्टोबर रोजीप्रत्येक गावात,तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सर्व शेतकरी बंधु व भगिनिंनी करावे असे आवाहन राष्ट्रीय किसान मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी केले आहे.
त्याचा भाग म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर तहसिलदार रुपेशकुमांर सुराणा यांना निवेदन देण्यात आले.
“राष्ट्रीय किसान मोर्चा” शेतक-यांच्या या राष्ट्रव्यापी संघटनेने दिले निवेदनातील मागण्या….
१)सोयाबीन, ज्वारी, कडधान्य, कापूस,व इतर पिकांना हमीभाव मिळावा .*
२)पीक विमा, इर्मा कायदयाची तात्काळ अंमलबजावणी करावी.
३)शेतीसाठी शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज मिळावी
४) स्वामिनाथन आयोग लागु करावा.
५)अतिवृष्टीमुळे देशभरातील शेतकरी संकटात आहे.शासनाने या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी.
६)प्रधानमंत्री पीक विमा योजना रद्द करून आर.आय.एम.ए. व इर्मा कायद्यावर आधारित पिक विमा अथवा सबसीडीची अंमलबजावणी करावी .
या प्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शिवाजी पाटील, बिव्हीएफ चे राजू मोरे,भूपेंद्र शिरसाठ,अजय भामरे,एकलहरे वि.का.सो चे संचालक ज्ञानेश्वर पाटील,सुभाष दुसाने,स्वप्नील पाटील,प्रमोद बिऱ्हाडे,अतुल डोळस आदी उपस्थित होते.
