माजी आमदार साहेबराव पाटील यांनी घेतले महिलांचे सौभाग्य “सिंदूर”चे उत्पादन अवघ्या दीड वर्षात…

 

अमळनेर येथील माजी आमदार ज्यांना कृषिभूषण म्हणून सन्मान मिळालेला आहे असे राजवड (आदर्शगांव) चे रहिवासी श्री साहेबराव पाटील यांनी आपल्या “राज” फार्मवर 15 ऑगस्ट, 2023 रोजी 35 *”सिंदूर”* रोपांची यशस्वी लागवड केली आहे. साधारणपणे *”सिंदूर”* चे उत्पादन हाती येण्यासाठी लागवडीच्या दिवसापासून 3 वर्षाचा कालावधी जावा लागतो. कृषीक्षेत्रात योजनाबद्ध शेती कामात बहुमोल कार्य केल्यामुळे लागवड केल्यापासून अवघ्या 15 महिन्यातच प्रती वृक्ष 1 किलोप्रमाणे 35 किलो *”सिंदूर”* चे प्रथम उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

             *”सिंदूर”* झाडावर लालसर रंगाची फळे (गुच्छ) येतात. फळे कोरडी झाल्यावर बिया काढल्या जातात. या बिया नैसर्गिकरीत्या गळद लालसर रंगाच्या असतात. या बियांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असते, जे सुरक्षित असते. बियांना सावलीत सुकवून तद्नंतर बारीक करून लालसर पावडर तयार केले जाते. हिच पावडर नैसर्गिक कुंकू म्हणून वापरले जाते.

 *”सिंदूर चा उपयोग”*

 हिंदू संस्कृतीत महिलांसाठी मांग भरणीसाठी (सौभाग्य लेणं) सिंदूर वापरले जाते. नैसर्गिक खाद्य रंग म्हणून पदार्थ रंगविण्यासाठीही सिंदूर चा वापर केला जातो. त्वचेसाठी उपयुक्त असल्यामुळे औषधी आणि सौंदर्य प्रसादनातही वापर होतो. धार्मिक विधीसाठीही उपयुक्त असून हे कुंकू बाजारातील रासायनिक कुंकूपेक्षा अधिक सुरक्षित आणि शुद्ध असते.असे महत्वपूर्ण उत्पादन वेळे पेक्षा कमी कालावधीत घेण्याची किमया माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नवीन काही तरी करण्याची धमक ठेवणारे साहेबराव पाटील अशीच किमया येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत करतील अशी चर्चा परिसरात होताना दिसतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!