मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण….

 

अमळनेर : मुस्लीम बांधवांची बकरी ईद अर्थात ‘ईद-उल-अज्हा’ शनिवारी (दि. ७ जून) ईदगाह मैदानावर सकाळी ७.३० वाजता शहर-ए-खतीब नवशाद आलम यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाजपठण पार पडले. त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.


बकरी ईद हा मुस्लीम समाजासाठी त्याग व बलिदानाचे प्रतीक मानला जाणारा महत्त्वाचा सण आहे. इस्लामिक पंचांगानुसार जिलहज्ज महिन्याच्या दहाव्या दिवशी तो साजरा केला जातो. शनिवार (दि.7) रोजी ईदच्या दिवशी सकाळी सामूहिक नमाजपठणानंतर कुर्बानी देण्यात आली. ईदगाह मैदानावर बांधवांकरीता ‘वुजू’करिता पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. देशात अमन व शांती नांदावी या साठी दुआ करण्यात आली. ईदच्या पार्श्वभूमीवी मुस्लीम बांधवांनी नवे कपडे खरेदी केले तर बालगोपाळांमध्ये ईदचा उत्साह अधिक पाहावयास मिळला. नगरपरिषद मार्फत स्वछता करण्यात आली. शहरातील मशिदींमध्ये शांततेत नमाजपठण बकरी ईदनिमित्त सकाळी पारंपरिक पद्धतीने शहालम नगर, कसाली, बेलदार मोहल्ला, बारी प्लॉट, अंदरपुरा, बाहेरपुरा, इस्लामपूरा, दर्गाह अली, इस्तेमा नगर, खाजा नगर, इमान पुरा, बकरा मार्केट,शाहनूरशा बाबा आदी भागांमधील मशिदींमध्येही नमाजपठणाचे नियोजन करण्यात आल्याने शांततेत नमाज अदा करण्यात आली. मशिदीच्या प्रमुख धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली हे नमाजपठण संपन्न झाले. दरम्यान उपस्थित डी वाय एस पी. कोते साहेब, पी आय. निकम साहेब, सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहरे, नासिर हाजी, शब्बीर पहेलवान, अखलाक भाई, रज्जाक शेख व ईदगाह कब्रस्तान ट्रस्ट तर्फ ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आले.ईदगाह मैदानावर पोलीस विभाग मार्फत चोख बंदोबस्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!