शैक्षणिक क्षेत्रात उतुंग कार्य केल्या बद्दल शिक्षिका शैला बैसाणे “शिक्षण रत्न’ पुरस्काराने सन्मानित..

अमळनेर येथील शिक्षिका शैला बैसाणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र पत्रकार संघाच्या 21व्या वर्धापन दिनी “शिक्षण रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वृत्त की, अमळनेर तालुक्यातील नविन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली -रंजाणे येथील शिक्षिका श्रीमती.शैला गंगाधर बैसाणे यांना त्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा 1 जुन रोजी संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे जि. कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्तरावरील “शिक्षण रत्न ” पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.त्यांना कोल्हापुरी फेटा, मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रीमती शैला बैसाणे एका प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते व कवी मनाचे समाजसुधारक शिक्षक दिवंगत दिनेश जाधव सरांच्या अर्धांगिनी आहेत.आपल्या पतीचा वारसा पुढे घेऊन जाण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. गरीब विदयार्थ्यांच्या मदतीला तत्पर असतात. मध्यक्ष बुद्धी असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय वेळे पेक्षा अतिरिक्त वेळ देऊन त्यांना शिकवत असतात.

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री.किरण सोनावणे होते.त्यांनी ‘पत्रकारिते समोरील आव्हाने व विश्वासार्हता’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी खासदार धैर्यशील माने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुचित मिणचेकर,राजु आवळे,विजय सिंह माने, विनायक भोसले,राजु मगदुम डी.वाय.पाटीलचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर, एलीट चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज नवी दिल्लीचे शंकर अदानी,महाराष्ट्र पत्रकार संघाचे राजाध्यक्ष विलासराव कोळेकर,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये,तालुका अध्यक्ष पापालाल सनदी, केडीसी बँक संचालक विजयसिंह माने,पोलीस उपअधीक्षक सदानंद सदाशिव, अविनाश बणगे विनायक भोसले, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे,आयुब मुल्ला पंढरीनाथ बोकारे,राजकुमार चौगुले,रमेश बोभाटे,जेष्ठ पत्रकार नगरसेवक मोहन हवालदार यांच्यासह विविध जिल्ह्यांमधून विविध कार्यकारी पदाधिकारी मान्यवरांची उपस्थिती होती.आभार राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर यांनी मानले.

  श्रीमती शैला बैसाणे (जाधव ) यांचे प्रोटॉन शिक्षक संघटनेचे महासचिव मिलिंद निकम,कमलाकर संदानशिव, प्रा जितेश संदानशिव, राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रा शिवाजी पाटील, गावराणी जागल्याचे विश्वास पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे विभागीय अध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे,सामाजिक कार्यकर्ते योगराज संदानशिव, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष तथा नगरसेवक नरेंद्र संदानशिव,मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा डॉ राहुल निकम,अर्जुन संदानशिव, किरण बहारे, दिपक चौघुले, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे,युवराज चव्हाण,राष्ट्रवादी विद्यार्थी सेल चे राहुल बिऱ्हाडे, समता परिषदेचे अजय भामरे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे,बिव्हीएफ चे राजू मोरे, श्रीकांत चिखलोदकर, पुरुषोत्तम माळी, प्रा डॉ सुजाता निकम,जगदीश बिऱ्हाडे, आदींनी कौतुक करत अभिनंदनचा वर्षाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!