अमळनेर येथील विश्व मानव रुहानी केंद्र, अमळनेर शाखेच्या सेवाकार्याला गती देण्यासाठी केंद्राचे नवानगर (हरियाणा) येथील मुख्यालया कडून नूतन प्रबंधक कार्यकारिणीची (व्यवस्थापन समिती) नुकतीच घोषणा करण्यात आली.केंद्राचे नावानगर मुख्यलायातील महासचिव हरजीत कौर यांच्या हस्ते ही नियुक्ती घोषित झाली असून, त्या संदर्भातील पत्र नुकतेच अमळनेर मानव केंद्रास प्राप्त झाले होते.

