अंमळनेर शहर प्रतिनिधी, येथील गांधली गावातील हवलेल्या तरुणीचा मृतदेह तब्ब्ल तीन दिवसांनंतर शिवारातील विहिरीत सापडल्याने उडाली खळबळ. प्रियंकरामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप केला नाते वाईकांनी.
सविस्तर वृत्त की, गांधली गावची रहिवासी असलेली जयश्री ही दि.10/12/2025 रोजी घरात कोणाला काहीएक न सांगता निघुन गेल्याने जयश्री हरवल्या बाबत नातेवाईकांनी दि.11/12/2025 रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.
मात्र दि.12/12/2025 रोजी दुपारी 12.00 वा. च्या सुमारास गावातील सुनील आण्णा पाटील यांनी फोन करुन मयत जयश्री च्या वडिलांना सांगितले की गावातील धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहरीत तुमची मुलगी जयश्री ही मयत अवस्थेत पडलेली असुन तुम्ही सदर ठिकाणी जावुन खात्री करा.असे कळविल्यावरुन खात्री झाली. त्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये जयश्री हिचे मरणाबाबत खबर दिल्याने अकस्मात मृत्यू नंबर 0113/2025 प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.
जयश्री हिचे गावातील विजय उर्फ राज विलास बागुल (भिल) याचे प्रेमाचे संबंध असल्याचे जयश्रीच्या चुलत भाऊ संदीप याचेकडुन आई वडिलांनां माहित झाले. तसेचं मागील पाच सहा महिन्यांपुर्वी जयश्री हिने स्वतःच्या राहत्या घरातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे कळते. जयश्री गांधली गावाच्या शिवारात 10/12/2025 रोजी दुपारी 04.00 वा. च्या सुमारास घरात कोणाला काहीएक न सांगता निघुन गेली होती. गांधली गावाच्या शिवारात असलेल्या धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहरीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. जयश्री च्या आत्महत्येस विजय उर्फ राज विलास बागुल (भिल) यांच्यात असलेले प्रेमाचे संबंध असल्याने तिला नैराश्य आले तसेच जयश्री हिस आत्महत्या करण्यास राज भिल याने प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत विजय उर्फ राज विलास बागुल (भिल) यांचविरुध्द फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास पीएसआय नामदेव बोरकर करीत आहे.
अमळनेर येथील फटाक्यांसारखा आवाज काढणारे कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकां विरुद्ध वाहतृक पोलिस कारवाईचा बड़गा उगारतील का,असा प्रश्न सुज्ञ नागरिक…