कुर्हे येथील तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल…

अमळनेर येथील कुर्हे गावातील एकाने शेतातील मका का तोडला याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी त्याच्या सह पत्नीलाही जबर मारहाण करून त्याच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना दि ९ रोजी घडली.

सविस्तर वृत्त की,तालुक्यातील कुहे येथील एक जण दि ८ रोजी सायंकाळी आपल्या शेतात काम करीत असताना गोपीचंद नारायण पाटील, सचिन गोपीचंद पाटील ,चंद्रकांत गोपीचंद पाटील हे तिघे आले व त्यांनी शेतातील मका पिकाची मोडतोड करून नुकसान केले.दि ९ रोजी सायंकाळी पुन्हा तिघांनी तोच प्रकार केल्याने शेतमालक त्यांना बोलायला गेले असता त्यांनी शिवीगाळ मारहाण केली.
मारहाणीत चंद्रकांत पाटील याने शेतमालकाला वर उचलून फेकून दिले त्यामुळे शेतमालकाच्या छातीवर पोटावर मुका मार लागला. शेतमालक बैलगाडीने घरी पोहचत नाही तोच तिघे त्याच्या घरी पोहचून त्याच्या पत्नीला व मुलीला शिवीगाळ व चापट बुक्क्यांनी मारहाण करत होते. चंद्रकांत पाटील याने मुलीचे कपडे फाडुन असभ्य वर्तन केले.

पीडित शेतमालकाने दवाखान्यात उपचार घेऊन नंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून गोपीचंद ,सचिन चंद्रकांत अशा तिघांविरुद्ध मारहाण व विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!