अमळनेर :उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचा मेळावा जळगाव येथील हॉटेल के.पी. प्राईड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेची केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. जयवंत मगर होते. यावेळी विचारमंचावर संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.बी. ए. संदानशिव, केंद्रीय सचिव डॉ.अनिल हिवाळे, डॉ. संतोष सुरडकर, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश महाले, प्रा. डॉ.राहुल निकम उपस्थित होते.

यावेळी जळगाव जिल्ह्याच्या नवनिर्वाचित अध्यक्षांची आणि अन्य पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यात जळगाव जिल्ह्य पूर्व विभागाचे अध्यक्ष म्हणून नूतन महाविद्यालय, जळगाव येथील प्रा डॉ. साहेब पडलवार यांची तर सचिव म्हणून प्रा.डॉ. अशोकराव चित्ते यांची निवड करण्यात आली.जळगाव जिल्हा पश्चिम विभागाचे अध्यक्ष म्हणून समाजकार्य महाविद्यालय,चोपडा येथील प्रा.डॉ. राहुल निकम यांची तर सचिव म्हणून प्रा.डॉ. अभिषेक धांडे, चाळीसगाव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कार्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली.

अध्यक्षपदावरून बोलताना प्रा.डॉ. जयवंत मगर यांनी आगामी काळातील संघटने समोरील आव्हानांचा आणि त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गाची जाणीव सर्व सदस्यांना करून दिली. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अनिल हिवाळे यांनी गेल्या तीन वर्षातील संघटनात्मक कार्याचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. अनेक प्राध्यापकांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली.
या मेळाव्याला जिल्हाभरातून 160 प्राध्यापकांनी नोंद करून उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. राहुल निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रॉ.डॉ. योगेश महाले यांनी केले.
