अमळनेर येथील डुबकी मारुती परिसरा लगत असलेल्या रेल्वे पटरी जवळ एक अनोळखी पुरुष इसम वय अंदाजे ३५ ते ३७ वर्ष, उंची – १७० से.मी, शरीर बांधा – मध्यम, रंग – सावळा, केस -काळे, कटींग केलेले, दाढी असलेला, चेहरा – लांबट गोल, पुढे आलेले दात पूर्ण, गुटखाने लालसर झालेले, उजव्या हाताचे मनगटावर मराठी भाषेत रोहित, अमोल, रोहित व इंग्रजी भाषेत S असे गोंदलेले, लाल व पिवळ्या रंगाचा दोरा बांधलेला, अंगात – हिरव्या फिककट रंगाचे फुल बाहीचे शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅट, काळ्या रंगाची अंडरवियर परिधान केलेले व पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेला, गळ्यात पांढऱ्या रंगाचा रूमाल,त्याच्या खिशात विमल गुटखा पुडी, तंबाखू चुन्याची पुडी मिळून आलेला इसम हा रात्रीच्या दरम्यान धावत्या रेल्वे मधून पडून डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखपती होऊन मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

