अमळनेर नगरपालिका निवडणुकीचे मतदान संपले असून, आता निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.मात्र, निवडणूक निकाल लांबनीवर गेल्याने उमेदवारांची चांगलीच धागधुग वाढली आहे.

अमळनेर नगरपालिका निवडणुकीत १८ प्रभागा मध्ये नगरसेवक पदा साठी एकूण १२९ उमेदवार रिंगणात होते. तर नगराध्यक्ष पदा साठी ६ उमेदवार उभे होते.एकूण ९७ मतदान केंद्र मध्ये मतदानाचा हक्क केवळ ६०•७२% इतके लोकांनीच बजावला आहे.
निवडणुकीच्या निकालाची घोषणा दि ३ डिसेंबर २०२५ रोजी केली जाणार होती.परंतु, काही ठिकाणी अनेकांनी उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याने निवडणूक निकाल लांबणीवर पडल्याने मतदान प्रक्रिया पार पडलेल्या उमेदवारांची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे.तसेच निवडणूक निकाल लांबनीवर गेल्याने उमेदवारांच्या समर्थकांमध्ये ही चिंतेचे वातावरण पसरले आहे.तसेच प्रभाग १ अ मधील इच्छुक उमेदवार देखील चिंतेत असल्याचे दिसते. यासह अंमळनेरकरांचे सुद्धा निकाला कडे लक्ष लागून आहे.
*निवडणूक आयोगाचे आश्वासन*
निवडणूक आयोगाने निवडणूक निकाल लांबणीवर पडल्याने उमेदवारांना आश्वासन दिले आहे की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडण्यात येईल .
*चोख सुरक्षा यंत्रनेचे कौतुक*

अमळनेरच्या मागील न पा निवडणुकीत काहीसे तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्या पारश्वभूमी वर पोलीस प्रशासन अलर्ट मोड वर होती. अतिशय चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडली नाही. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व त्यांच्या सर्व पोलीस सहकार्याचे करडी नजर न्यूज तर्फे कौतुक केले जात आहे.
*निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सुनियोजन*

