अमळनेर येथील देवगाव देवळी येथे एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि १ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सविस्तर वृत्त की, हिंगोणे जळोद येथील आदिवासी समाजातील दिनेश बळी पावर व देवगाव देवळी येथील अल्पवयीन अश्विनी गोकुळ भिल यांनी प्रेम संबधातून आत्महत्या केल्याचे कळतं. विशेष बाब म्हणजे यादोघांनी देवगाव देवळी येथील आयटीआय कॉलेज च्या मागे असलेल्या निंबाच्या झाडाला उंचावर एकाच दोरखंडाने गळफास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मयत दिनेश हा जळोद येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर काम करत होता तर अश्विनी ही देवगाव देवळी येथे मजुरी करत होती असल्याचे समजते .
सदर ची घटना देवळी च्या पोलीस पाटलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला कळवल्याने डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हेड कॉ संतोष नगारे, उदय बोरसे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली . गावकऱ्यांच्या मदतीने दोघा चे शव खाली उत्तरवण्यात आले. त्यावेळी मुलीच्या गळयात मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू लावल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमाचा संबंध असावा आणि त्यांनी ३० रोजी रात्रीच आत्महत्या केली असावी. दोघांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुलीचे मामा मनोज शांताराम मोरे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.