अमळनेर येथील कलाली शिवारातील शेतात एका अनोळखी इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की,कलाली शिवारात गरबड धनगर यांचे शेतात दि १६ जानेवारी रोजी कडुलिंबाच्या झाडाला अज्ञात इसमाचा लटकलेला मृतदेह आढळला होता.
याबाबत कलाली येथील पोलीस पाटील सौ वसुंधरा पद्माकर पाटील यांनी मारवड पोलिसात खबर दिल्याने मारवड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.सदर मयत 40 ते 45 वयोगटातील असून त्याचे उजवे हाताच्या कामेवर मदनसिंग नाव नोंदलेले व त्याचे कंबरेत लाल रंगाची अंडरपॅन्ट,काळे रंगाचा करगोटा आहे.तरी सदर मयत व्यक्तीस कुणी ओळखत असल्यास त्यांनी पो. हे. कॉ. सुनिल पाटील कींवा मारवड पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
