अमळनेर,मास्वे आयोजित नागपूर स्थित राष्ट्रीय परिषदेत अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व विदयार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे.

सविस्तर वृत्त की,नागपूर येथे दोन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स “रिपब्लिक इंडिया @75 अँड बीयोंड” 31 जानेवारी ते 01 फेब्रुवारी 2025 दरम्यान होत आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स अर्थात मास्वे चा तीस वर्ष पुर्ती समारंभ साजरा करण्यात येत आहे.नागपूर येथील वानमती येथील वसंतराव नाईक स्मृति सभागृह येथे संपन्न होत आहे.
या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी बोलताना मुखयमंत्री प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय स्तरावर सोशल वर्क एज्युकेशन काऊन्सिल स्थापन करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी उपेंद्र कोठेकर, मुबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ राजन वेळुकर, सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रधान सचिव आर डी शिंदे, गांधी डॉस यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शिव्या मुक्त समाज अभियान बोधचिन्ह अनावरण करण्यात आले.महाराष्ट्रातील पहिले शिव्या मुक्त गाव असा ठराव करणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील सौनदाळे ग्रामपंचायतचे सरपंच शरद राव अरगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
कार्यक्रम उद्घाटन मासवे चे संस्थापक अध्यक्ष डॉ अंबादास मोहिते यांनी केले तर सूत्र संचलन डॉ दीपक वलोकर यांनी केले.
या राष्ट्रीय परिषदेत अमळनेर येथील श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा विजयकुमार वाघमारे, प्रा.डाॅ.भरत दशरथ खंडागळे यांचे सह 26 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला आणि उपस्थितांची मनं जिंकली.
