प्रताप महाविद्यालयात अंबवलेले अन्न महोत्सव उत्साहात साजरा

     अमळनेर- येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एफ.वाय ते एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांसाठी Fermented food स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

      एकूण 35 विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन जिवाणू तसेच यीस्ट यांच्या सहाय्याने फरमेंट केलेले विविध प्रकारचे पोषक पदार्थांचे सादरीकरण केले.

    या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून महाविद्यालयातील गणित विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.नलिनी पाटील यांना आमंत्रित करण्यात आले.त्यांनी उत्तमरीतीने परिक्षण करून विविध पौष्टिक पाककृतीं बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

     सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.एस.ए.जोशी यांनी सांगितले कीअभ्यासक्रमातील विषयाला आपण उपयोजित पद्धतीने कृतीद्वारे कसे सादर करू शकतो हे अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्याना शिकायला मिळते.

     कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.वैशाली महाजन यांच्यासह विभागातील अन्य सहकारी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!