अमळनेरच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रवेशासाठी चढाओढ; दर्जेदार शिक्षणाचा ३५ वर्षांचा देदीप्यमान वारसा!

विशेष बातमी…….प्रा डॉ विजय गाढे, अमळनेर 

अमळनेर:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब ॲड. विजय नवल पाटील यांनी १० जुलै १९९० रोजी अमळनेर येथे नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे शिक्षणरुपी रोपटे लावले होते. आज या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला असून, हे महाविद्यालय खान्देशातीलच नव्हे तर इतर भागांतील विद्यार्थ्यांचेही एक प्रमुख पसंतीचे केंद्र (विद्यानगरी) बनले आहे. आजच्या घडीला शैक्षणिक क्षेत्रातील विविध बदलांमुळे बीएड (B.Ed.) प्रवेशाकडे काही प्रमाणात नकारात्मकता असली, तरी या महाविद्यालयातील प्रवेशासाठी मात्र विद्यार्थी व पालकांची मोठी ओढ दिसून येत आहे.

३५ बॅचेसचा यशस्वी प्रवास आणि देशपातळीवर नावलौकिक

संस्थेचे संस्थापक ॲड. विजय नवल पाटील यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर गुजरात, बंगलोर आणि दिल्लीपर्यंत शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले आहे. अमळनेरच्या  शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून (नॅक मूल्यांकन दर्जा – B) आतापर्यंत तब्बल ३५ बॅचेस यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्या आहेत. येथे घडलेले आदर्श शिक्षक आज ‘रयत शिक्षण संस्था’ यांसारख्या नामांकित व दर्जेदार संस्थांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवत आहेत. महाविद्यालयात ५०-५० विद्यार्थ्यांच्या दोन तुकड्या असून, दरवर्षी अत्यंत कमी कालावधीतच येथील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते, हे या महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे सर्वात मोठे प्रमाण आहे.

विद्यावाचस्पती (Ph.D.) प्राध्यापकांचे दर्जेदार मार्गदर्शन

या महाविद्यालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील सर्व प्राध्यापक हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी ‘विद्यावाचस्पती’ (Ph.D.) ही सर्वोच्च पदवी धारण केलेली आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून कायमच पात्र आणि तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. संस्थेविषयी असलेल्या जिव्हाळ्यामुळे अनेक प्राध्यापकांनी शासन नियमानुसार याच महाविद्यालयात आपली प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्ती घेतली आहे, जे महाविद्यालयातील कौटुंबिक आणि समृद्ध वातावरणाची साक्ष देते.

ग्रंथालय: महाविद्यालयाचा मुख्य आत्मा

महाविद्यालयाचे ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे कपाट नसून तो या महाविद्यालयाचा खऱ्या अर्थाने ‘आत्मा’ आहे. हे ग्रंथालय विविध संदर्भ ग्रंथ आणि अभ्यासक्रमाच्या पुस्तकांनी परिपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात.

मार्गदर्शन शिबिरे: विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ग्रंथपाल विविध विषयांवर विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करतात.

उत्कृष्ट साहित्याची उपलब्धता: विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे लिखाण असलेल्या नामांकित लेखकांची पुस्तके सहज उपलब्ध करून दिली जातात.

या समृद्ध ग्रंथालयामुळे आणि शैक्षणिक सुविधांमुळे महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचे:

विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक व शैक्षणिक सुखसुविधा पुरविण्याला महाविद्यालयाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. यामुळेच, आजही शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण पिढीसाठी नवल भाऊ प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय (नॅक मूल्यांकन दर्जा – B) ही पहिली पसंती ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!