अमळनेर-येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे शेतकरयांच्या विविध मागण्यांचे प्रांताधिकारीना दिले निवेदन.

सविस्तर वृत्त की,निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्ती चे आश्वासन दिले होते मात्र अद्याप दिलेले आश्वासन पूर्ती साठी कोणतेच पाऊल उचलले नाही,तसेच यावर्षी कापसाला पाहिजे तसा हमी भाव मिळाला नाही. म्हणून शेतक-यांना प्रति क्विंटल ५०००/-प्रमाणे अनुदान देण्यात यावे,अमळनेर मधील अनेक शेतकऱ्यांचा कापुस हा अद्यापही घरात पडलेला असून अमळनेर मध्ये सी.सी.आय. सुरु करण्यात यावे.तसेच तालुक्यात यावर्षी मका, गहू, हरभरा,भरडधान्याचे शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे.अतिवृष्टीच्या पंचनाम्यामध्ये काही ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची नावे पंचनाम्यात नजर चुकीने राहुन गेल्याने ग्रामसेवकांना आदेश करुन सुटलेली नावे तात्काळ समाविष्ट करण्यात यावी आदी मागण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा तर्फे अमळनेर प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

सदर निवेदन देतांना राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,पक्ष निरीक्षक भास्करराव काळे,ओबीसी अध्यक्ष अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती सह जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील,तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, कविता पवार,भारती पाटील,अनंत निकम,युवक अध्यक्ष परेश शिंदे,सुनिल अहिरराव,अक्षय पाटील,वासुदेव पवार,ईश्वर पाटील,कल्पेश गुजर विनोद बोरसे यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
