अँग्रीस्टॅक नोंदणी नकेलेल्या शेतकऱ्यांनी सरकार सेवा केंद्रावर जावून E-kyc पूर्ण करुन घ्यावी -वैशाली चव्हाण,निवासी उपजिल्हाधिकार

     जळगाव : सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान तात्काळ जमा होणेसाठी E-kyc पूर्ण करण्याचे आवाहन वैशाली चव्हाण,निवासी उपजिल्हाधिकार यांनी केले आहे.

     जळगाव जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून दिनांक १० ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार एकूण ३१८.३६ कोटी अनुदान प्राप्त झाले असून तालुकास्तरावरुन सदर अनुदान वाटपाबाबतचे कामकाज सुरु आहे.

मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक ०४ / ११ / २०२५ रोजीच्या दुरचित्रवाणी (VC) द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार E-kyc पोर्टल दिनांक ०५/११/२०२५ पासुन सुरु होत असून ज्या शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून E-kyc पूर्ण करुन घ्यावी,असे जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!