स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर महेश पाटील यांची निवड…काँग्रेस चे तरुणांवर जबाबदारी देण्याचे संकेत

    अमळनेर येथील जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर निवड करण्यात आली आहे. 

        आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून मा.प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सूचनेनुसार तसेच मा.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवड मंडळाची स्थापना करण्यात आली असून नुकतीच मंडळातील सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली. युवक काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष महेश दगडू पाटील यांची दोन्ही यादीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून आगामी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडीत हे निवड मंडळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. युवा कार्यकर्ते महेश पाटील यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!