जेईई-मेन २०२६ च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया २७ नोव्हेंबर पर्यंत..

      पुणेः अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई-मेन २०२६ च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जनोंदणीसाठी २७ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली असून, नोंदणी शनिवारपासून सुरू झाली आहे.

    केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने २०१९ पासून राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडे या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सोपवली आहे. जेईई मेन परीक्षेचे दोन पेपर घेतले जातात.पेपर १ अंतर्गत बी. ई. -बी.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो. या गुणांवरूनच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था आणि इतर केंद्र पुरस्कृत तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश होतो. तसेच ही परीक्षा जेईईसाठी पात्रता ठरते, ज्यावर आधारित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. पेपर २ अंतर्गत देशभरातील बी.आर्क आणि बी. प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.

      २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी जेईई मेन परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे.पहिला टप्पा सत्र १ जानेवारी २०२६ मध्ये तर दुसरा टप्पा एप्रिल २०२६ मध्ये होईल. पहिल्या सत्रातील परीक्षा २१ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षाकेंद्र आणि दिनांकाची माहिती प्रवेशपत्रात दिली जाणार असून, निकाल १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे असे एनटीएकडून कळविण्यात आले आहे.

सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार

       शुल्क भरण्याची अंतिम तारीख – २७ नोव्हेंबर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२५, शुल्क भरण्याची अंतिम तारी २७ नोव्हेंबर २०२५ (रात्री ११.५० वाजेपर्यंत), परीक्षा केंद्राच्या शहराची घोषणा- जानेवारी २०२६ च्या पहिल् आठवड्यात, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा- पुढील सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार, परीक्षेच्या तारीख २१ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान, केंद्र, तारीख आणि शिफ्ट प्रवेशपत्रावर नमूद केल्याप्रमाणे उत्तरपत्रिका,उत्तरतालिका प्रसिद्धी नंतर संकेतस्थळावर जाहीर होणार,.

अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!