खासगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये मिळणार १०८ रुग्णवाहिकेची सुविधा…

मुंबई : महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह सरकारी योजना राबवणाऱ्या खासगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये १०८ रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत.

      रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा (१०८ रुग्णवाहिका) विस्तार करून रुग्णवाहिकांचे एकत्रित संचलन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात आरोग्यविभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातू १०२, १०४ आणि १०८ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकां माध्यमातून मोफत सुविधा दिली जाते. सद्यस्थिती राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत या रुग्णवाहिकांच्य माध्यामातून सुविधा देण्यात येते. आपत्कालीन स्थिती रुग्णाने विनंती केली तर जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल केले जाते. परंतु खासगी रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णाला दुसऱ्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी ही सुविधा देण्यात येत नाही.

तातडीने मदत मिळणार

    काही रुग्णालयांचा योजनेला विरोध.सरकारच्या नव्या निर्णयामुळे रुग्णांना तातडीने मदत मिळणार असून, योजनांचाही लाभ मिळू शकतो,असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यात आरोग्य विभागासह अन्य विभागांकडून रुग्णवाहिकांची सेवा दिली जाते. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित संचलन करण्याचाही विचार केला जात आहे. राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांत सरकारी योजना लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. काही रुग्णालयांनी योजना लागू करण्याला विरोध केला असून धर्मादाय रुग्णालयांना योजना लागू कराव्या लागतील, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!