अमळनेर येथील नगाव बुद्रुक गावांत नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावातील पाण्याच्या टाकीखाली साचलेले घाण पाणी नागरिक वापरत आहेत. त्यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. गणेश ज्ञानेश्वर पारधी वय अंदाजे 15 वर्ष नावाच्या एका रुग्णाला जीबीएस (गुलियन-बॅरे सिंड्रोम) व्हायरसची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गावातील पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे टाकीखाली घाण पाणी साचले आहे. हेच पाणी नागरिक वापरत असल्यामुळे त्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाब यांसारखे आजार होत असतात. गावात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
