कर्तव्य बजावताना माणुसकीचे दर्शन; भर उन्हात कोसळलेल्या पुजाऱ्याच्या मदतीला धावले वाहतूक पोलीस….. मात्र…

   अंमळनेर: सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढत असताना, अंगाची लाहीलाही करणाऱ्या ‘धगधगत्या’ उन्हातही वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. अशाच एका कडक उन्हात कर्तव्यावर असताना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी संजय बोरसे व रविंद्र बोरसे यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

​नेमकी घटना काय?

​    बस स्थानक परिसरात बद्रीनाथ मंदिराचे पुजारी श्रीहरी दिक्षित (वय ६९) अचानक उन्हाच्या तीव्रतेमुळे चक्कर येऊन कोसळले. ही बाब लक्षात येताच, तिथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी संजय बोरसे व रविंद्र बोरसे यांनी क्षणाचाही विलंब न लावता इतरांच्या मदतीने पुजाऱ्यांना तात्काळ ऑटो रिक्षा मधून ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘मयत’ घोषित केले.पुढील तपास पो कॉ मिलिंद सोनार करत आहेत.

पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

​या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत:

वयोवृद्ध नागरिकांनी या कडक उन्हात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.

​महिला आणि बालकांनी देखील उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यक असेल तरच बाहेर निगावे.

​घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल आणि सोबत पाण्याची बाटली ठेवून आवश्यक ती काळजी घ्यावी.

​      भर उन्हात आपले कर्तव्य चोख बजावत असतानाच एका नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी संजय बोरसे व रविंद्र बोरसे यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे, तरीही पुजाऱ्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!