जळगाव:जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल तर भाषेचा अडथळा यशाच्या मार्गात कधीच येत नाही, हे शेंदुर्णी येथील कन्या कु. अरीन निकम हिने सिद्ध करून दाखवले आहे. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मराठी माध्यमातून घेतल्यानंतर, अचानक इंग्रजी माध्यमात प्रवेश घेऊन अरीनने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुणांसह घवघवीत यश संपादन केले आहे.

बदली अन् शिक्षणाचे नवे वळण
अरीनचे वडील डॉ. राहुल निकम आणि आई डॉ. मीना निकम यांची बदली झाल्यामुळे निकम कुटुंब शेंदुर्णीहून जळगाव येथे स्थायिक झाले. सातवीपर्यंतचे शिक्षण मराठीतून झाल्यामुळे पुढचा प्रवास सोपा नव्हता. मात्र, अरीनने इंग्रजी माध्यमात शिकण्याची जिद्द धरली आणि जळगाव येथील प्रसिद्ध सेंट टेरेसा स्कूलमध्ये प्रवेश घेतला.
अडचणींवर केली मात
पहिलीपासून मराठी भाषेत शिक्षण घेतल्यामुळे सुरुवातीला इंग्रजी माध्यमातील विषय समजून घेताना अरीनला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तांत्रिक शब्द आणि संवाद साधताना येणाऱ्या मर्यादांवर तिने अहोरात्र मेहनत घेतली. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तिने या भाषेच्या भिंती पाडल्या आणि निकालात आपल्या कौशल्याची मोहोर उमटवली.
यशाचे मानकरी
अरीनच्या या यशात शाळेच्या प्राचार्या ज्युलीयट सिस्टर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुटुंबातील सदस्यांनी तिला वेळोवेळी मानसिक बळ दिले. यामध्ये:
आजोबा-आजी: आत्माराम निकम व वासंती निकम.(सेवानिवृत्त शिक्षक)
काका-काकू: संदीप, एड अविनाश, अनिता आणि प्रा वर्षा निकम.
आत्या: प्रा. साक्षी बागुल आणि प्रा. डॉ. सुजाता गाढे.
मामा-मावशी: केतन व चेतन दामोदरे, वैशाली मावशी.
भावंडे: डॉ. दीक्षिता सासवानी, डॉ. किमया बागुल,डॉ सुगध गाढे, कु. अर्णव कु. अरहन, आराध्या, आरव आणि अर्श.
मराठी ते इंग्रजी असा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अरीनचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ग्रामीण भागातून शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणा ठरली आहे.
