अमळनेर येथे दि 22 रोजी मराठा जोडो अभियान अंतर्गत मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा दि १८ मार्च ते १ मे २०२५ दरम्यान भोसले गढी वेरूळ ते लाल महाल पुणे पर्यंत काढण्यात येत आहे. या यात्रेचे आगमन अंमळनेर येथे दि २२ रोजी आगमन होत आहे.

सविस्तर वृत्त की, मराठा सेवा संघाने राज्यातील गटा तटात असलेल्या मराठा समाजात एकजूट निर्माण करण्याकामी वज्र मूठ तयार करून मराठा समाजाच्या समस्या सोडवणूक व्हावी म्हणून दि १८ मार्च ते १ मे २०२५ दरम्यान भोसले गढी वेरूळ ते लाल महाल पुणे पर्यंत माँ जिजाऊ रथ यात्रचे करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर येथे दि 22 रोजी मुक्ताईनगर ,जळगाव ,धरणगाव टाकरखेडा मार्गे सदर रथयात्रा सकाळी ११ वाजता पैलाड भागात पोहचणार आहे. पैलाड येथून निघून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,सुभाष चौक , सानेगुरुजी पुतळा , शिवाजी महाराज नाट्यगृह , स्टेशन रोड , महाराणा प्रताप चौक , बळीराजा स्मारक , जिजाऊ प्रवेशद्वार याठिकाणी येईल.
पैलाड येथे समस्त बहुजन समाज सह मराठा सेवा संघ व सर्व समाज महिला मंडळ यांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.
पैलाड येथून रथ यात्रेसोबत महिलांची मोटरसायकल रॅली असणार आहे.रस्त्यातील सर्व स्मारक , थोर पुरुषांना अभिवादन करून सदर ची रथ यात्रा बळीराजा चौकात समारोप होईल. त्यांनतर जिजाऊ रथयात्रा मराठा मंगल कार्यालयात दर्शनासाठी असणार आहे. दरम्यान मराठा मंगल कार्यालयात मान्यवर उपस्थितानां मार्गदर्शन करणार आहे.
त्यांनतर सदर माँ जिजाऊ रथ हा मंगरूळ ,जानवे ,डांगर ,चोपडाई मार्गे धुळ्याला रवाना होणार आहे.
आयोजकाचे आवाहन….
जास्तीत जास्त मराठा समाज बांधव , महिला , जिजाऊ प्रेमींनी ,शिव प्रेमीं सह बहुजन समाजाने या रथ यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
