अमळनेरात कुत्रा चावून रेबीज झाल्याने ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू…

अमळनेर : कुत्रा चावून रेबीज झाल्याने एका ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूड नाका परिसरात घडली.

सविस्तर वृत्त असे की,शिरूड नाका परिसरातील प्रवीण सूर्यवंशी याला ऑगस्ट २०२१ मध्ये कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र त्यावेळी त्याने अँटीरेबीज ची लस अथवा कोणतेही औषध घेतले नव्हते. प्रवीण याला दारूचे व्यसन असल्याने अनेकदा तो कुत्र्याच्या
लहान पिल्लुशी खेळत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी देखील प्रवीण याला कुत्रा चावला होता व तेव्हाही त्याने इंजेक्शन घेतले नव्हते.दि २६ डिसें. रोजी प्रवीणला अचानक पाण्याचा फोबिया झाला. त्याला कोणीतरी आपल्या अंगावर पाणी टाकतेय म्हणून भीती वाटू लागली. म्हणून त्याला ग्रामीण रु्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.सुरुवातीला डॉक्टरांना दारूच्या नशेत असल्याने दारू मुळे हा प्रकार होत असावा असे वाटले. नंतर डॉक्टरांना लक्षात आले.इंजेक्शन दिल्यावर प्रवीण बोलका झाला तेव्हा त्याने चौकशीत दोन वेळा कुत्रा चावल्याचे सांगितले.दि २७ रोजी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी खबरदारी म्हणून प्रवीण च्या संपर्कात आलेल्याना देखील अॅँटीरेबीज इंजेक्शन दिले आहेत. प्रवीणचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या महिनाभरात अमळनेर तालुक्यातील नगाव ,गडखाम्ब , मंगरूळ ढेकू ,शिरूड नाका अशा विविध भागांतील सुमारे १०३ लोकांना कुत्रा चावला आहे. लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.

डॉ जी.एम.पाटील,मुख्य वैद्यकीय अधिकारी…. कुत्रा चावणे नागरिकांनी सहज घेऊ नये.ग्रामीण रुग्णालयात अँटीरेबीज इंजेकशन मोफत देण्यात येते. कुत्रा चावल्याबरोबर लगेच इंजेक्शन
घ्यावे आणि दिलेल्या तारखेवरच तीन कोर्स पूर्ण करावेत अन्यथा रेबीज होऊन अखेर मृत्यू होऊ शकतो.

योगेश पाटील,मयताचा नातेवाईक… शिरूडनाका परिसरात कुत्रयांचे प्रमाण वाढले आहे. या भागातील एकाच कुत्रीने किमान ५० जणांना चावा घेतला आहे. याचा बंदोबस्त झाला पाहिजे.

संतोष बिर्हाडे,आरोग्यनिरीक्षक… शहरातील कुत्रांच्या निर्बिजीकरणाचा ठेका देण्यात आला आहे.घनकचरा प्रकल्पाकडे शेड बांधण्यात आले आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर निर्बीजिकरण करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!