*गेले ! ते दिन गेले*

🎭🌼🎼🌺🎶🌺🎼🌼🎭

*वेगवेगळी फुले उमलली,*
*रचुनि त्यांचे झेले*
*एकमेकांवरी उधळले,*
*गेले ! ते दिन गेले*

*कदंब-तरूला बांधुनि दोला,*
*उंच-खालती झोले*
*परस्परांनी दिले-घेतले,*
*गेले ! ते दिन गेले*

*हरीत बिलोरी वेलबुटीवरि,*
*शीतरसांचे प्याले*
*अन्योन्यांनी किती झोकले,*
*गेले ! ते दिन गेले*

*निर्मलभावे नव देखावे,*
*भरुनी दोन्ही डोळे*
*तू मी मिळुनी रोज पाहिले,*
*गेले ! ते दिन गेले*

🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹

*गीत : भवानीशंकर पंडित* ✍️
*संगीत : श्रीनिवास खळे*
*स्वर : पं. हृदयनाथ मंगेशकर*

🎼🎶🎼🎶🎼 🎧

*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-१.०१.२०२५

🌻🥀🍃🎼🌺🎼🍃🥀🌻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!