🌹⚜️🌹🎼🌅🎼🌹⚜️🌹 🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻 *सरत्या आंग्ल वर्षाच्या* *कृतज्ञतेची.. आत्मचिंतनाची* 🌸🌿🔆🌺🌞🌺🔆🌿🌸

🌹⚜️🌹🎼🌅🎼🌹⚜️🌹

🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

*सरत्या आंग्ल वर्षाच्या*
*कृतज्ञतेची.. आत्मचिंतनाची*

🌸🌿🔆🌺🌞🌺🔆🌿🌸

 

*नित्य सुर्योदय होतो आणि अस्तालाही जातो. हेयुगानुयुगे सुरू आहे. मग याचा हिशेब कसा ठेवणार.. म्हणून मग त्याची गणना सुरु झाली.प्रत्येकाची गणनेची पद्धती वेगळी. अशाच कालगणनेतील आज हे आंग्ल वर्ष समाप्त होत आहे.*

*जग जवळ आलेय. भारतीय लोक जगभर आहेत. भारतीय संस्कृती सर्वांचा आदर करणारी आहे. यामुळेच भारतीयांचा जगभर सन्मान होतोय. या जगमान्य नववर्षाचेही स्वागतही जगाला शुभेच्छा देत करणारच.*

*कथा कोणत्याही कालमापनाची असो,या कथेचा शेवट हा आत्मचिंतनास प्रवृत्त करतो. या वर्षाचेही असेच आहे. क्षणभंगुर जीवनातील हे समाप्त होणारे पूर्ण वर्ष कसे गेले.. लोक आपल्याशी कसे वागले.. आपण कसे वागलो.. आपल्याकडून कुणी दुखावला तर गेला नाही ना.. कळत नकळत मीकुणाला दुःख तर दिले नाही ना.. यावर चिंतन करणारा हा आज वर्षाचा शेवटचा दिवस.*

*जगात अनेक जिवघेण्या घटना घडतात. काही मानवनिर्मित तर काही निसर्ग निर्मित. कुठे युद्ध तर कुठे सतत अपघात. पण तरीही निर्विकाराने या जिवाला धडधाकट ठेवलेय.. संकटापासून दूर ठेवले म्हणून लोक निर्विकाराचे आभार मानायला आज गर्दी करतात. या भक्तांची तर निर्विकाराकडे काहीच मागणी नसते.*

*पोटापुरता पैसा पाहिजे,*
*नको पिकाया पोळी*
*देणाऱ्याचे हात हजारो,*
*दुबळी माझी झोळी !*

*असेम्हणतहे  लोकप्राप्त परिस्थितीत समाधानी.. संतुष्ट आनंदी असतात. त्यांची कुठलीच तक्रार नसते. पोटापुरता पैसा पाहिजे ही आत्मसंतुष्ट वृत्ती. निर्विकाराच्या मनात आले तर तो एवढे दान पदरात टाकतो की झोळी दुबळी ठरते, हे लोकांना ज्ञात असते.*

*पण वाळूकणा प्रमाणे हातून निसटून गेलेले निसर्ग सहवासातील सुखद क्षण पण आहेत त्या स्मृती काही काळ घर करणारच, पण ‘गेले ते दिन’ हे मात्र खरे.*

*एकमात्र निश्चित की,आजचा सूर्यास्त अमंगल आठवणी गिळंकृत करणार. उद्याचा अरुणोदय सर्वांच्या जीवनात नवे सूर अन नवे तराणे.. नव चैतन्य आणणार.

*या समाज जीवनात अकारण उदभवणारे अविश्वासाचे.. आरोप प्रत्यारोपाचे सूर आता दूर होवोत.. सगळ्यांच्या मनांत परस्पराविषयी पवित्र भाव जागृत होवोत, परस्परांशी मने जोडली जावोत हीच आज प्रार्थना करु या. आणि.. आणि सिद्ध होवू या उद्याच्या मंगलमय.. शुभंकर सुर्योदया साठी. जो घेऊन येईल आपल्या जीवनात नित्य नूतन ‘आनंदी पहाट’.*

🎭🌼🎼🌺🎶🌺🎼🌼🎭

*प्रा डॉ विजय गाढे*
*मुख्य संपादक, करडी नजर न्यूज*

🌻🥀🍃🎼🌺🎼🍃🥀🌻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!