श्रावण मासानिमित्त अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक…. ​नगरसेवक महेश देशमुख ठरले सपत्नीक पूजेचे विशेष मानकरी; भाविकांचा मोठा उत्साह

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात श्रावण मासानिमित्त सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) अत्यंत भक्तीमय व मंगलमय वातावरणात रुद्र महाभिषेक सोहळा संपन्न झाला. या धार्मिक विधीचे विशेष मानकरी म्हणून नगरसेवक महेश देशमुख यांनी सपत्नीक श्री मंगलेश्वर महादेवांच्या पिंडीवर विधिवत जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पूजा-अर्चा आणि बिल्वार्चना केली.

     ​संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी परंपरेनुसार पार पडला. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, परशुराम शर्मा व उमेश पाठक यांनी पौरोहित्य केले. महाभिषेकानंतर झालेल्या महाआरतीवेळी शंखनाद, घंटानाद आणि भाविकांच्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

​या सोहळ्यास संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर यांच्यासह अनेक सेवेकरी, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!