अमळनेर : बजाज फायनान्सच्या कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कथित धमकी, शिवीगाळ, मानसिक त्रास, आरडाओरड व अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.

