अमळनेर येथील डांगरी प्र. निम्मं तापी प्रकल्प बाधित 210 घरांची त्वरित मोजणी करावी अन्यथा सदर घरे बांधकामास मंजुरी मिळावी करिता दि 26 जाने 2025 रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदना द्वारे प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक अमळनेर यांना कळविले आहे.

सविस्तर वृत्त असे की,निम्मं तापी प्रकल्प बाधित डांगरी प्र येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून पाडळसरे धरणाच्या निर्मिती मध्ये बॅक वाटर मुळे रहिवास असलेले घर सदरच्या पाण्यामुळे बाधित झाले आहेत.या कारणांमुळे त्यांच्या जीवनमानावर मोठा वाईट परिणाम होत आहे. पुनर्वसन व्हावे म्हणून अनेकदा शासनाकडे तोंडी व लेखी तक्रार केल्या आहेत मात्र अद्याप या बाबी कडे शासन दुर्लक्ष करत असल्याची भावना बाधित ग्रामस्थाची निर्माण झाली आहे.
बाधित घरांची मोजणी करून तात्काळ पुनर्वसन करावे अन्यथा घरांची दुरवस्था पाहता सदरची घरे बांधकाम करण्यासाठी परवानगी नदिल्या बाबत येत्या 26 जानेवारी 2025 रोजी संपुर्ण बाधित गावकरी प्रांतकार्यालया समोर उपोषणास बसणार आहोत,अश्या आशयाचे निवेदन अमळनेर प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
