विशेष लेख….✍️✍️✍️
जगाच्या इतिहासामध्ये शांतता, बंधुभाव, दया आणि मानवी मूल्यांची पुनर्रचना करणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर (स.). त्यांनी ज्या काळात जन्म घेतला, तो काळ अज्ञानाचा, हिंसेचा आणि अन्यायाचा काळ मानला जात असे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी समाजात शांतता, सुव्यवस्था आणि न्यायाची स्थापना केली. कुराणाने त्यांना संपूर्ण विश्वासाठी ‘शांतता आणि दयेचा स्रोत’ (रहमतुल-लील-आलमीन) म्हणून संबोधले आहे.

