अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात श्रावण पर्वानिमित्त सोमवारी (दि. २४) भक्तीमय वातावरणात ‘रुद्र महाभिषेक’ संपन्न झाला. या पूजेचे विशेष मानकरी म्हणून शहराचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व सौ. सोनालीताई निकम यांनी श्री मंगळेश्वर महादेवांच्या पिंडीवर विधिवत अभिषेक, पूजा-अर्चना व बिल्वार्चना केली.

