अमळनेर येथील एका शेतकर्या च्या मोटरसायकला लावलेली तब्बल ३ लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने शहरातील बाजारपेठेतून लंपास केल्याची घटना दि 11 रोजी दुपारी सुमारे १.३० वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त की,वासरे गावचे रहिवासी शिवाजी भानुदास पाटील यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे व खतांच्या खरेदीसाठी ३,०০,০০০ रुपये रोख काढून सदर रक्कम त्यांनी आपल्या जवळील निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवून ती स्वतःच्या बजाज प्लॅंटीना मोटरसायकलच्या हॅण्डलला टांगुन ते बाजारपेठेत बियाणे व खते खरेदीसाठी जात असताना त्यांच्या मुलाचा फोन आल्याने ते शहरातील बाजारपेठेत विजय शॉपीसमोरील फळांच्या हातगाडीवर आंबे खरेदी करीत असतांना तेव्हा कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटरसायकलवरील पैशांची टांगलेली पिशवी चोरून नेली.
शिवाजी भानुदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात गु.नं. 230/2025, भादंवि कलम 303(2) नुसार नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉँ विनोद सोनवणे करीत आहेत.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे आवाहन —
नागरिकांनी आपल्या जवळ असलेली रोख रक्कम बाळगत सतर्क राहणे आवश्यक आहे. रोख रक्कम असलेल्या पिशव्या मोटरसायकलला लावून ठेवू नये. आपल्या जवळ सुरक्षितपणे बाळगावी. नागरिकांनी बॅक परिसरात कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.
