मुंबई : राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण झपाठ्याने वाढत असताना राज्याच्या गृह विभागाने ‘पोहेकॉ’ अर्थात पोलिस हेड कॉन्स्टेबलाना गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे गुन्ह्मांच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.राज्यातील वाढ़ते शहरीकरण व गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी गृह विभागाने पोलिस हेड कॉन्स्टेबलाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे सशर्त अधिकार दिलेत.
राजपत्रही जारी :-
आतापर्यत हा अधिकार केवळ पोलिस उपनिरीक्षक पदा पर्यतच्या अधिकाऱ्यांना होता. पण आता त्यात पोहेकॉची ही भर पड़ली आहे.गृह विभागाने ९ मे रोजी जारी केलेल्या आपल्या राजपत्राद्वारे ही माहिती दिली आहे.या राजपत्रानुसार, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस हेड कॉन्स्टेबल किमान पदरवीधर असावा. त्याची ७ वर्षाची सेवा पूर्ण झालीअसावी. तसेच गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथील ६.आठवड्यांचे विशेष प्रशिक्षणपूर्ण व परीक्षा उत्तीर्ण असावा.
