स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यासाठी होणार फेर प्रभाग रचना…

अमळनेर,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. 

सर्वोच् न्यायाल्याच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.त्यानुसार आता राज्य सरकारला फेरप्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील जवळपास पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील राजकारण्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश होते, मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निरदेशा नुसार आता आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातच आता निवडणूकआयोगाने देखील

या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी कंबर कसली आहे. यात आता राज्य सरकारला फेरफार रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!