अमळनेर येथील निवडणुकीच्या प्रचाराने शिखर गाठले आहे. मतदारांना आपल्या कडे वळवून वोट मिळविण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याचा चंग उमेदवार करतांना दिसत असतांना मात्र प्रभाग क्रं ७ मध्ये काही वेगळे अनुभवाला मिळत आहे.
प्रभाग क्रं ७ मध्ये स्थानिक मतदारांच्या आग्रहस्तव अपक्ष उमेदवारी करणाऱ्या कापडणे घराण्याच्या सून सौ प्रा योगिता सयाजीराव कापडणे यांना प्रभागातील नागरिकांचा निस्वार्थ पाठींबा मिळत आहे. अपक्ष उमेदवार सौ योगिता कापडणे यांचे सासरे शिक्षण महर्षी आबासाहेब व. ता. पाटील यांनी उभारलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे हजारो विद्यार्थी घडले, असंख्य कुटुंबांचे जीवन बदलले आणि संपूर्ण परिसरात ज्ञान संस्कारांचा दीप पेटवला. या कुटुंबातील समाजसेवेचा वारसा म्हणून परिसरात शिक्षण, समाजकारण आणि लोकसेवा या तिन्ही मूल्यांचे सुंदर मिश्रण ठळकपणे परिवारात रूजलेले असल्याने मतदारांनी सौ योगिता कापडणे यांच्या साठी प्रभागातील विद्यार्थी, पालक, वयोवृद्ध नागरिक अतिशय उस्फुर्त पणे प्रचार करतांना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा विजय नक्की होणार असे दिसून येते.
प्रभागातील प्रत्येक घराशी जुळलेले नाते, नागरिकांसाठी कधीही उपलब्ध राहण्याची वृत्ती आणि कामाचे अचूक नियोजन,साधेपणा, मनमिळावू स्वभाव आणि जबाबदारीने काम पूर्ण करण्याची तयारी यामुळेच प्रभागातील नागरिकांचा विश्वास वर्षानुवर्ष अधिक दृढ झाला आहे. प्रभागाती नागरिकांचे प्रश्न, रस्ते-पाणी-स्वच्छता या मूलभूत गरजा आणि वंचित घटकांच्या अडचणी याकडे सदर कापडणे घराणे सातत्याने लक्ष देत असल्याने स्वच्छेने मतदार दारोदार फिरून पाठींबा मिळवत असल्याने त्यांच्या विरोधातील शहर विकास आघाडी व शिवसेनेच्या उमेदवारांनी धडकी घेतल्याचे समजते.