अमळनेर प्रतिनिधी येथील विधानसभा निवडणुकीत आघाडी तर्फे डॉ अनिल शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने तालुक्यातील कार्यकर्त्या मध्ये चैतन्य निर्माण झाले असून काटे की टक्कर होणार.
अमळनेर विधानसभा मतदार संघातील मतदार हे पंरपरा गत काँग्रेसच्या विचारधारेचा असल्याचे मानले जाते.मध्यंतरी भाजपाच्या तिकिटावर डॉ बी एस पाटील यांच्या तीन टर्म सोडला तर या मतदार संघावर राष्ट्रवादी ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.अर्थात दोघं पक्ष हे पुरोगामी असल्याने इथल्या मतदारांनी त्यांच्या उमेदवारांना संधी दिल्याचे पहायला मिळते.म्हणूनच बहुजन चेहरा घेऊन आलेले शिरीष चौधरी यांना ही संधी देण्यात आली.

तब्बल २५ वर्षा नंतर अमळनेर विधानसभा मतदार संघ काँग्रेसला उमेदवारी करण्यासाठी संधी मिळाली आहे.या निवडणुकीत आघाडी तर्फे उमेदवारी निश्चित करण्यात विलंब लागल्याने अनेकांच्या नजरा लागून होत्या.मात्र काल रात्री काँग्रेस ची चौथी यादी जाहीर झाली व त्यात डॉ अनिल शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.यामुळे काँग्रेस सह आघाडीच्या कार्यकर्त्या मध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.काँग्रेसला उमेदवारी मिळाल्याने या पक्षाचे पारंपारिक मतदारांनी आनंद व्यक्त केला.कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.डॉ अनिल शिंदे यांना उमेदवारी जाहीर होताच तालुक्यातील जुने जाणते काँग्रेसचे नेते मुन्ना शर्मा,धनगरदला पाटील,सुरेश पिरण पाटील,संजय पूनाजी पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले व जिंकण्याचा निर्धार केला. डॉ अनिल शिंदे यांच्या माध्यमातून निवडणुकीला रंग चढल्याचे दिसून येत आहे.विद्यमान आमदार यांना मोठा प्रतिस्पर्धी मिळाल्याची चर्चा होत आहे.

अमळनेर मध्ये बऱ्याच कालावधी नंतर काँग्रेसला उमेदवारी मिळाल्याने काँग्रेस पक्षाची मतदार संघात “ताई- माई – आक्का विचार करा पक्का आणि पंजावर मारा शिक्का” च्या घोषणा पुन्हा एकायला मिळणार.
