अमळनेर येथील प्रभाग क्रं १३ मधून नगरसेवक पदासाठी रिंगणात उभे ठाकलेले स्वेच्छा निवृत्त पोलीस तथा उच्च शिक्षित उमेदवार सुनील महाजन यांची धाडसी वृत्ती पाहून प्रभागातील मतदारांनी निवडून आणण्याचा मानस केल्याचे बघायला मिळते.
सुनील महाजन हें पूर्वी पोलीस खात्यात असल्याने त्यांच्यात धाडसाने काम करण्याची वृत्ती उपजत होती. बालपणा पासून व्यायाम, मैदानी खेळ यात पारंगत असल्याने समोरच्याला आपल्या डावपेचतून धाडसाने चारी मुंड्या चित करण्याची धाडसी वृत्ती त्यांच्या वंश परंपरागत असल्याचे बोलले जात आहे.
कोणतेही काम धाडसाने करण्याची जिद्द बघून प्रभाग क्र १३ मधील मतदारांनी नगरपालिकेत पाठविण्यासाठी मानस बनविल्याचे दिसते. त्यांना ही गोष्ट विजया कडे घेऊन जात असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसते.