अमळनेर : न पा निवडणुकीतील नगराध्यक्ष पदा साठी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उभे असलेले जितूभाऊ उर्फ जितेंद्र ठाकूर सर यांनाच भावी नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याचा निर्णय तालुका ठाकूर समाज सेवा संघाच्या बैठकित घेण्यात आला.
शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर हेच आमचे उमेदवार असल्याचा एकमुखी निर्णय ठाकूर समाजाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री.जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर उर्फ जितू ठाकूर यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली. बहुसंख्य ठाकूर बांधव या बैठकीला उपस्थित होते. आमदार अनिल पाटील यांनी ठाकूर समाजाला न्याय दिला असून त्यांच्या निवडीचा मान ठेवत सर्व ठाकूर समाजाचा उमेदवार म्हणून जितू ठाकूर यांच्या पाठीशी संपूर्ण समाजाने उभे रहावे असे ठरविण्यात आले. सर्व समाज बांधवांनी मिळून जितू ठाकूर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत रणजीत शिंदे, चेतन ठाकूर व गुणवंत वाघ यांनी घेतली माघार…
या बैठकीवेळी तालुका ठाकूर जमात सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप धोंडू ठाकूर, ठाकूर समाज सेवा मंडळाचे महाराष्ट्र सरचिटणीस रणजित शिंदे, यांच्यासह पदाधिकारी, सर्व समाज बांधव उपस्थित होते.