अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 8 अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मधून अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांची माघार झाल्याने अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे तरुण उमेदवार सचिन बळवंत पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत.
तब्ब्ल नऊ वर्षा नंतर अमळनेर न पा ची निवडणूक होत असल्याने चूरशी ची लढत होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीने वेधले आहे. या निवडणुकीत विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात शहर विकास आघाडीच्या माध्यमातून महायुती रिंगणात उतरली आहे. तर दुसरी कडे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मा एकनाथ शिंदे च्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रवेश केल्याने त्यांनी ही अमळनेर न पा च्या निवडणुकीत ताकदीने उमेदवार रिंगणात उभे केले आहे. अमळनेर नगरपालिकेत प्रथमच सर्व जागेवर शिवसेने आपले उमेदवार उभे करण्याची किमया केली आहे. तसेच या निवडणुकी महा आघाडी सह उबाठा सेनेला मात्र सर्व जागेवर उमेदवार उभे करण्यात यश मिळालेले नाही.त्यामुळे अंमळनेरात आमदार अनिल पाटील विरुद्ध माजी आमदार शिरीष चौधरी अशी प्रतिष्ठेची लढत बघायला मिळत आहे.
अश्यातच नगरपरिषद निवडणुकीत शहर विकास आघाडीचा उमेदवार सचिन पाटील हें प्रभाग क्र ८ मधून बिनविरोध झाल्याने सर्व उमेदवारांनी प्रचंड जल्लोष साजरा केला.निवडीनंतर सचिन पाटील यांच्यासह समर्थकांनी आमदार अनिल पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या निवासस्थानी जाऊन जल्लोष साजरा केला.
यावेळी आमदार अनिल पाटील बोलताना म्हणाले की सचिन पाटील यांनी सदैव नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले, त्यांच्या अडचणींच्या समाधानासाठी निस्वार्थीपणे धाव घेतली. त्यांची साधी स्वभावशैली, सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि प्रभागातील सातत्यपूर्ण जनसंपर्काने त्यांना जनतेच्या हृदयातील नेता म्हणून स्थान मिळवून दिले. याचीच पावती म्हणून आज प्रभाग 8 अ मधील जनता एकमुखाने आपल्या प्रिय नेत्याला विजयी करून विकासाला नवी चालना दिली असून शहर विकास आघाडीवर दाखविलेला हा विश्वासच आहे.अमळनेर तालुका शहर विकास आघाडीला हा जनतेचा मजबूत पाठिंबाच असून
या अविस्मरणीय विजयाने अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर, पारदर्शक नेतृत्वावर आणि जनहिताच्या राजकारणावर जनतेने ठेवलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे. हा विजय आघाडीच्या विकासनितीला मिळालेली मोठी भरारी आहे अशी भावना आमदारांनी व्यक्त केली.
अमळनेर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेर नगर परिषदेतर्फे सर्व सफाई कामगार, कार्यालयीन अधिकारी व…