माया-बहिणीच्या प्रचंड उपस्थितीत डॉ अनिल शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज….रविंद्र चौधरी यांनी डॉ अनिल शिंदे यांच्या रॅलीचे स्वागत करून मैत्रीपूर्ण लढतीचे दिले संकेत.

अमळनेर प्रतिनिधी, येथील विधानसभा निवडणुकीत आघाडी तर्फे काँग्रेस चे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी आज प्रमुख धार्मिक स्थळा सह महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून असंख्य महिला मतदार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातून रॅली काढून प्रांतधिकारी कार्यालय समोर समारोप केला व आघाडीतील राष्ट्रवादीचे डॉ बी एस पाटील,शिवसेनाच्या नेत्या ऍड ललिता पाटील,राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील आदीच्या समेवत उमेदवारी अर्ज अमळनेर निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडेवार यांना सादर केला.

सदरच्या रॅलीत खूप मोठ्या माया बहिणी उस्फुर्त सहभागी झाल्या होत्या.अबाल वृद्ध सह तरुण वर्ग ही हजर असल्याचे पाहायला मिळाले.मुस्लिम बघिणी सह तरुण वर्ग यांनी हिरारीने आपला सहभाग नोंदवला होता.प्रत्येक समाज घटकातील नागरिक व कार्यकर्ते यांनी आवरजून उपस्थित असल्याचे दिसून आले.तसेच आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील राजकीय पुढारी आपली उपस्थिती दर्शवित होते.

रॅलीत सहभागी महिलांच्या हातात डॉ अनिल शिंदे यांच्या नावाचे बोर्ड होते. डॉ अनिल शिंदे यांच्या विजयासाठी रोडाच्या दोन्ही बाजूला उभे असलेल्या नागरिकांना हात जोडून विनंती करीत होते. तरुणाई जोषपूर्ण घोषणा देऊन परिसर दणाणून सोडत होते.

डॉअनिल शिंदे यांची रॅली अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्या कार्यालय समोर आली असता त्यांचे वडील बंधू प्रा रविंद्र चौधरी यांनी डॉ अनिल शिंदे यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत केले व मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले.

तालुक्यातील काना कोपऱ्यातून ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावल्याने विरोधकांच्या पाया खालची वाळू नक्कीच सरकली असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.सध्या तरी विधानसभेत तगडी लढत होणार यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!