अमळनेर येथील न पा निवडणुकीत प्रभाग क्र 2 मध्ये सामाजिक सलोखा राखण्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व मुक्तार खाटीक यांच्या अर्धागणी सौं अफसाना बी यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केल्याने विरोधकांच्या मनात धडकी भरल्याचे रंगली चर्चा.

राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तब्बल तेरा वर्ष शहराध्यक्ष पद सांभाळणारे तथा तालुक्यात दोन धर्मात सामाजिक सलोखा राखण्यात अग्रेसर असणारे सर्व सामान्य कुटुबांतून येणारे सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्व श्री मुक्तार दादा खाटीक यांनी नगरपालिका निवडणुकीत मतदारांच्या आग्रहा खातीर आपली अर्धांगणी सौं अफसाना बी यांचा प्रभाग क्र २ मधील सर्वसाधारण महिला संवर्गातून नामांकन अर्ज दाखल केल्याने मतदारा माध्ये नवं चैतन्य निर्माण झाल्याने त्यांच्या विरोधकांच्या मनात धडकी भरल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
सौं अफसाना बी यांचे पती मुक्तार खाटीक हें विद्यमान आमदार अनिल पाटील यांचे अतिशय निकटवर्ती कार्यकर्ते असल्याने त्यांनी आमदार फ़ंडातून प्रभाग क्रं २ मध्ये रस्त्याचा बिकट प्रश्न सोडविला आहे. प्रभागातील विप्रो कंपनी च्या सांड पाण्याचा किचकट प्रश्न मध्यस्थीने सोडविण्यात पुढाकार घेतल्याने स्थानिक नागरिक त्यांच्या या कार्यावर समाधानी असल्याचे दिसते.स्थानिकांच्या रेट्यामुळे सौं अफसाना बी मुक्तार खाटीक यांनी प्रभागातील मान्यवरांच्या उपस्थितीत आपला नामांकन अर्ज मोठ्या उत्सहात दाखल केला.
सौं अफसाना बी मुक्तार खाटीक यांनी सांगितले की, प्रभागातील महिलांना स्वतंत्र शौचालंय, वृद्ध पुरुष व महिलांना मोकळा श्वास घेता यावा व त्यांना मोकळ फिरता यावे म्हणून नाना – नानी पार्क उभारणार असल्याचे सांगितले. तसेच प्रभागातील प्रत्येक कॉलनी वसाहतीत सिमेंट चे भक्कम रस्ते व नाले तयार करणार, सर्वात महत्वाचे म्हणजे प्रभाग असलेल्या विप्रो समूहाच्या कंपनीत स्थानिक शिक्षित तरुणांना कायमस्वरूपी नोकरीं मिळवून देण्यास राजकीय नेत्यांची मदत घेऊन ते काम तडीस लावणार असल्याचे ही सांगितले. मतदारांनी विकासाचा दृष्टींकोण ठेवून मला निवडून देण्याचे आवाहन यां वेळी त्यांनी केले.
