अमळनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत एक अनोखा प्रचारचिन्ह चर्चा केंद्र बनला आहे अर्थात शिलाई मशीन. वर्तमान नगरसेवक उमेदवार कैलास पाटील यांनी आपल्या प्रचारात शिलाई मशीनला प्रतीक म्हणून स्वीकारले आहे. “शिलाई मशीन हे केवळ घरातील एक साधन नाही, तर महिला सशक्तिकरणाचे प्रतीक आहे,” असे कैलास पाटील यांनी करडी नजर न्यूज ला प्रतिक्रिया यांनी सांगितले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी अगदी जिव्हाळ्याचे म्हणून शिलाई मशीन ही अतिशय महत्वपूर्ण वस्तू आहे.
मतदारांची प्रतिक्रिया
स्थानीय निवासी आणि महिला संघटनांनी या अनोख्या चिन्हाचे स्वागत केले आहे. “आणि आम्हाला रोजगाराची संधी मिळाली तर आमचे वोट त्यांनाच,” अशी प्रतिक्रिया एका महिला मतदाराने दिली. काही मतदारांनी या चिन्हामुळे कैलास नामदेव पाटील यांच्या प्रामाणिक पणावर विश्वास व्यक्त केला.
शिलाई मशीन हे केवळ एक घरेलू उपकरण न राहता, अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत सामाजिक सशक्तिकरणाचे प्रतीक बनले आहे. सरकारी योजनांचा लाभ उठवून, महिला सशक्तिकरणाला प्राधान्य देणारा उमेदवार म्हणून कैलास नामदेव पाटील यांची लोकप्रियता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
