अमळनेर मधील प्रचाराने वेग पकडला असून मतदारांना प्रलोभनातून आकृष्ट करण्यासाठी उमेदवार पाराकष्ट करीत आहे. विविध मार्गाचा अवलंब करीत आहे.
प्रभाग क्रं १५ मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उच्च शिक्षित एकमेव उमेदवार प्रशांत निकम यांना प्रभागात फिरतांना नागरिकांचे दुःख समजून आल्याने त्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भावनिक वृतीचे प्रशांत निकम यांनी प्रभागातील एका अनाथ मुलाच्या शैक्षणिक संगोपणाची जबाबदारी स्वीकारली. विशेष बाब निवडणुकीचा निकाल कोणताही लागो सदरची जबाबदाऱी ही शेवट पर्यंत पेलवणार असल्याचे करडी नजर न्यूजला प्रतिक्रिया देतानां सांगितले.
प्रशांत निकम यांना पुरोगामी विचारांची झालर असल्याने पीडिताचे दुःख हरण करण्याची वृत्ती त्यांना विजयाकडे खेचून घेतल्या शिवाय राहणार नाही, अशी चर्चा जन सामान्य नागरिक करतांना दिसते.
अमळनेर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुक प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमळनेर शहरातील पाच मतदान केंद्र सुशोभीकरण करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात अमळनेर…