भुसावल येथे बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या माध्यमातून जळगाव जिल्हा स्तरिय प्रबोधन सत्र मा पंचशिला मोहोळ मॅडम (राज्य प्रचारक बिन) यांच्या अध्यक्षतेखाली वरणगाव फॅक्टरीत मोठ्या उत्साहात संपन्न.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलेल्या संविधानाच्या कलम १९ नुसार (कार्यक्रम घेणे, सभा घेणे, बोलणे….) ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथिल सार्वजनिक बौद्ध विहारात “बुध्दीष्ट इंटरनॅशनल नेटवर्क” च्या माध्यमातून तथागत भगवान बुध्दांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची अध्यक्षता मा पंचशिला मोहोळ मॅडम (राज्य प्रचारक, बिन) तर उद्घाटक मा संगिताताई भामरे मॅडम (दक्षता व विधी समिती सदस्य भुसावळ कोर्ट) या होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा विशाखा पाटील मॅडम (मंडळाधिकारी, मुक्ताईनगर) होत्या. तसेच कार्यक्रमात मा कुसुमताई गायकवाड, शिलांबरीताई जमदाडे, साक्षी खरे, बि. डी. महाले सर, शुध्दोधन खंडारे सर, उदयभाऊ सपकाळे यांनी विषयाला धरून महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीते साठी विशेष सहकार्य प्रकाश सोनवणे सर,अजयभाऊ खंडारे, विकास सुरवाडे, विलास चिकने, आशिष वारके, संजयभाऊ भालेराव तसेच सहयोगी संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले.
