अमळनेर , भक्ती आणि राष्ट्रसेवेचा अनोखा संगम ठरलेला श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अमळनेर शहरातील मुंदडा इस्टेट, गलवाडे रोड येथे दिनांक १२, १३ व १४ मे २०२५ रोजी अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि एकात्मतेने साजरा करण्यात आला.

धार्मिक पूजनविधी, मिरवणूक, विविध संस्कार आणि महाप्रसाद यांसह या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले सामूहिक महामृत्युंजय हवन, सरस्वती हवन आणि महाकाल हवन.
या पवित्र यज्ञकुंडासमोर नागरिक, सैनिकांचे कुटुंबीय, महिला भगिनी, बालगोपाळ आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र आले. मंत्रोच्चारांच्या गजरात सैनिकांच्या नावाने आहुती दिल्या गेल्या. सैनिकांच्या कल्याणासाठी अशा सामूहिक प्रार्थना आणि धार्मिक विधी प्रथमच घडत असल्याने परिसरात विशेष भारावलेले वातावरण अनुभवायला मिळाले.
या सोहळ्याला खान्देशभूषण श्री ओमप्रकाजी मुंदडा व युवकांचे बिझनेस आयकॉन श्री अमेयजी मुंदडा यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. मंदिर बांधकामासाठी बांधकाम अभियंता श्री निश्चयजी अग्रवाल व त्यांच्या टीमचे योगदान उल्लेखनी होते.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संदेश पाटील, अनिकेत देशमुख, मनोज शिंदे, भूषण उपासनी, जिजाबराव शिसोदे, गणेश शिंगारे, गिरधर पाटील, विशाल सूर्यवंशी, दीपक सोनावणे, अनिल पवार, आर. एस. पाटील, विजय चौधरी, राजेश पाटील, सुभाष पाटील, ऋषिकेश पाटील, रितेश विसपुते, योगेश चौधरी, विजय साळुंखे, प्रकाश पाटील, जितेंद्र चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.
