अमळनेर : येथिल सामाजिक कार्यकर्ता तथा महासंघर्ष लाईव्ह 24 न्यूजचे संपादक सौ भाग्यश्री पाटील यांना पुणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महिला दिनाचे औचित्य साधून स्वप्नील फाउंडेशन, पुणे तर्फे राज्य स्तरीय महिला गुण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सौ भाग्यश्री पाटील या अनेक दिवसांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहे. विशेष बाब म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात महिला संपादक म्हणून कमी कालावधीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना या प्रसंगी शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह व मेडल देऊन गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार स्वप्नील फाउंडेशन, पुणे चे संदिप राक्षे सर,आयजी श्री मंडलिक(सीआयडी),अध्यक्ष मराठी चित्रपट श्री मेघराज राजे भोसले,होम मिनिस्टर खेळाचे बादशहा श्री बाळकृष्ण नेहरकर,संस्थापक अध्यक्ष शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे श्री लक्ष्मीकांत खाबिया,चला हवा येऊ द्या च्या अभिनेत्री शिवकांता सुतार,पैगंबर शेख,शोभाताई वल्लाक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील विविध भागांतील लोकांची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती.भाग्यश्री पाटील यांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नाशिक विभागाचे उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे, अमळनेर तालुका अध्यक्ष समाधान मैराळे, उपाध्यक्ष सुरेश कांबळे, नूर खान,आत्माराम अहिरे,प्रवीण बैसाने,हितेंद्र बडगुजर, यदुविर पाटील,गणेश चव्हाण, सत्तार खान सह अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यानी अभिनंदनाचा वर्षाव केला.
