अमळनेरमध्ये ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ उत्साहात संपन्न….. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

 

      अमळनेर पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात भव्य असा ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व अमळनेर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यामुळे पोलीस व पत्रकार यांच्यातील समन्वय, परस्पर विश्वास व सामाजिक बांधिलकीचे प्रभावी दर्शन घडले.

        कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री ॲड. विजय नवल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे होते. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह राजकीय, प्रशासकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

        उदघाट्न भाषणात माजी केंद्रीय मंत्री ऍड विजय नवल पाटील यांनी सांगितले की, पोलीस आणि पत्रकार यांची सामाजिक बांधिलकी ही उल्लेखनीय आहे. पत्रकार हा समाजमानचा आरसा तर नागरिक आणि शासनां मधील दुवा असतो. पत्रकारिता ही समाजातील अनिष्ठ घटनावर प्रहार करणारी तर चांगल्या गोष्टी प्रकाशात आणण्यासाठी असली पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या वृतपत्राद्वारे सामाजिक अनिष्ठ प्रथेवर आसूड ओढून समाजात अमूलाग्र बदल घडवीला. सत्ता स्थित्यातंरात पत्रकार हा अहम भूमिका बजावत असतो तर पोलीस हा सामाजिक आरोग्य सुदृढ राखण्यात कसोशीने प्रयत्नशील असतो.

      याप्रसंगी पोलीस व पत्रकार दिना निमित्ताने घेण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामनातील विजेत्या पोलीस संघाला मान्यवरांच्या हस्ते विजेती ट्रॉफी देण्यात आली. सामनातील उत्कृष्ट फलंदाज प्रल्हाद सूर्यवंशी यांना तर उत्कृष्ट गोलंदाज राहुल पाटील यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पत्रकार मुन्ना शेख, निबंध स्पर्धेत गट अ मधील प्रथम क्रमांक दिक्षिता भामरे, गट ब मध्ये श्रुती शिरसाठ, गट क मध्ये कृष्णा निकम यांना विशेष सन्मान चिन्ह व सहभाग प्रशस्ती पत्र देण्यात आले. तसेच पत्रकार संघटने कडून खान्देशी कलाकारानां ही विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव

    समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये—

आ. अनिल भाईदास पाटील व ओमप्रकाश मुंदडा ( अमळनेर भूषण)

ॲड. विजय नवल पाटील व भिकन पाटील (शिक्षण महर्षी)

प्रा शिवाजीराव पाटील (साहित्य रत्न)

पांडुरंग पाटील (जीवन गौरव (पत्रकारिता)

मंगळग्रह मंदिर देवस्थान(आदर्श देवस्थान)

डॉ. जी. एम. पाटील (आरोग्य देवदूत)

डॉ. प्रशांत शिंदे (आदर्श आरोग्य सेवादूत)

अजय शिवरामे (आदर्श कर्मचारी)

महेश पाटील( आदर्श लोकसेवक)

अमळनेर वाहतूक पोलीस विभाग( उत्कृष्ट सेवा)

सिद्धांत सिसोदे (आदर्श पोलीस कर्मचारी)

अनिता सुरडकर (आदर्श शिक्षिका)

कैलास पाटील (उद्योगरत्न)

प्रेमकुमार सासनाणी,प्रितेश पारख, रोनक संकलेचा, जितेंद्र गुंजाळ, प्रेमकुमार सासनाणी ( युवा उद्योजक)विक्की जाधव (आदर्श उद्योजक)

किरण (कृष्णा) बहारे (समाज भूषण)

ज्ञानेश्वर धनगर (आदर्श समाजसेवक)

सौ. रिता बाविस्कर (आदर्श सामाजिक कार्यकर्त्या)

प्रवीण पाटील (उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता)

डिगांबर वाघ (उत्कृष्ट अभियंता)

एकनाथ सोनवणे (आदर्श वृत्तपत्र वितरक)

गोविंद गायकवाड (उत्कृष्ट गायक)

रविंद्र भोई (उत्कृष्ट कलाकार)

पारस गोल्ड (आदर्श सुवर्णकार)

नितीन पाटील( आदर्श सरपंच)

   सदरच्या महोत्सवात खानदेशातील अहिराणी कलाकार पुष्पा ठाकूर,गोविंद गायकवाड, रवींद्र भोई,भैया मोरे, शशांक संदानशिव,अल्ताफ राजा, जगदीश, आकाश पवार,राजा दाभाडे आदींनी आपल्या नृत्य व गायनाने उपस्थितांचे मन जिंकली.

      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे व प्रसिद्धी विनोदी कलाकर विलास शिरसाठ यांनी केले तर आभार प्रा डॉ विजय गाढे यांनी केले.

​       हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने:​डॉ. समाधान मैराळे (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभाग तथा तालुकाध्यक्ष)​प्रा. डॉ. विजय गाढे (खान्देश उपाध्यक्ष)सुरेश ​कांबळे (जिल्हा सरचिटणीस)​यदुवीर पाटील (जिल्हा उपाध्यक्ष)​नूर खान पठाण व प्रवीण बैसाणे (तालुका उपाध्यक्ष)​आत्माराम अहिरे (तालुका संघटक)​हितेंद्र बडगुजर (तालुका कार्याध्यक्ष)गणेश चव्हाण (तालुका प्रसिद्धीप्रमुख)​सुरेंद्र जैन, राहुल भदाणे, रिजवान मनियार, योगेश वाणी, सत्तार खान, किशोर वाणी (तालुका सदस्य)​या सर्व टीमच्या नियोजनामुळे व एपीआय शिरसाठ,पीएसआय समाधान गायकवाड, पोकॉ सिद्धातं सिसोदे यांच्या विशेष सहकार्य मुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पोलीस आणि पत्रकारांच्या या एकत्र येण्यामुळे शहरात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!