ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रत्यक्ष सहभागी भारतीय जवानाचे अमळनेरात जंगी स्वागत…

अमळनेर येथील सुपुत्र व भारतीय सेनादलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले तसेच भारत पाक युद्ध सुरू झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन अनेक आतंकवाद्यांना कंठस्थानी पाठवून आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शौर्य, वीरतेच्या परिचय दिला म्हणून करण्यात आले जंगी स्वागत . 

          सविस्तर वृत्त असे की, अमळनेर येथील ताडेपुरा भिम नगर भागातील विजय किरण संदानशिव हे भारतीय सेनादलातील महार बटालियन III या रेजिमेंट मधील जवान सुट्टीवर असताना ऑपरेशन सिंदूर करीता सैन्य दलाकडून अचानक बोलवण्यात आले, जम्मू काश्मीर येथे परिस्थिती खूप नाजूक असताना या वीर जवानांनी कुठल्या ही गोष्टीचा विचार न करता, वीरता, शौर्यच्या जोरावर पाकिस्तान मधील अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान पोचवले, 10 मे रोजी यांच्या रेजिमेंटवर पाकिस्तानाकडून ड्रोन हल्ला करण्यात आला, त्यावेळी काही जवान जखमी झाले तर वीर जवान विजय संदानशिव 25 मिटर लांब असल्यामुळे थोडक्यात बचावले, त्यानंतर त्यांच्या तुकडीने संपूर्ण ऑपरेशन सिंदूर यशस्वीरिता पार पाडले. 

       सिंदूर ऑपरेशन संपल्याने अमळनेरचे सुपुत्र सुखरूप घरी आल्यावर अमळनेर येथील पंचशिल युवक मंडळतर्फे या वीर जवानाचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण बहारे सह मंडळातील विनोद संदानशिव,स्वप्निल बि-हाडे,कुंदन बिऱ्हाडे,गडडु बाविस्कर प्रविण जगताप राज बि-हाडे रोहीत अहीरे अविनाश करंदीकर विक्की सपकाळे अनिल वाघ राहुल बिऱ्हाडे समाधान ढिवरे,दर्शन बिऱ्हाडे,राहुल बिऱ्हाडे,शुभम घोलप,सुनील बिऱ्हाडे, संदीप बैसाणे,सागर ईंगळे,आकाश वाघ प्रेम बि-हाडे अतिश सोनवणे मयुर करणकाळे राज वाघ अविनाश शिरसाठ भैय्या बिऱ्हाडे प्रवीण बैसाणे यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीर जवान विजय संदानशिव हें अमळनेर पोलीस स्टेशन मधील DB पथकातील विनोद संदानशिव यांचे बंधू आहेत.अशा वीर जवानाचे संपूर्ण परिसरात अभिमानाने कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!